Sanjay Raut | अमित शाह काश्मीर दौऱ्यावर आहेत, त्यांनी तिथंच थांबावं – संजय राऊत

अनंतनाग, श्रीनगर, बारामुल्ला, गुलमर्ग या भागात मोठ्या प्रमाणात दहशतवाद सुरु आहे. देशाचे गृहमंत्री तिकडे जाऊन थांबले तिकडे जाऊन तर नक्कीच अतिरेक्यांवर दबाव येईल आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना, आर्मीला, पोलिसांना पाठबळ मिळेल’, अशी प्रतिक्रिया दिली.

नाशिक : सध्या जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदुंना लक्ष्य केलं जात आहे. तर दुसरीकडे बांग्लादेशातही हिंदू वस्त्यांवर हल्ले केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जम्मू-काश्मिर दौऱ्यावर गेले आहेत. त्याबाबत विचारलं असता राऊत यांनी अमित शाहांनी काही दिवस काश्मिरमध्येच राहावं, अशी टिप्पणी केलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काश्मिर दौऱ्यावर आहेत, असं एका पत्रकारानं म्हटलं. त्यावर संजय राऊत यांनी लगेच ‘चांगली गोष्ट आहे. त्यांनी तिथेच राहावं काही दिवस. अनंतनाग, श्रीनगर, बारामुल्ला, गुलमर्ग या भागात मोठ्या प्रमाणात दहशतवाद सुरु आहे. देशाचे गृहमंत्री तिकडे जाऊन थांबले तिकडे जाऊन तर नक्कीच अतिरेक्यांवर दबाव येईल आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना, आर्मीला, पोलिसांना पाठबळ मिळेल’, अशी प्रतिक्रिया दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI