महायुतीच्या दोन आमदारांची बेताल वक्तव्य बघाच, एकाची ऑन कॅमेरा शिवीगाळ तर दुसऱ्यानं थेट मंत्र्याचाच बाप…
महायुती मधल्या दोन आमदारांनी बेताल वक्तव्य केल्याचे पाहायला मिळालंय. जुन्नरमधून अपक्ष निवडून आलेले आणि शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार शरद सोनावणे यांनी मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले तर भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेना थेट शिवीगाळ केलेली आहे.
जुन्नरमधून अपक्ष निवडून आलेले आणि शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या आमदार शरद सोनावणे यांनी मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले. आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्याबद्दल जुन्नरमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार महोदयांनी घोडेगांव प्रकल्पाचे अधिकारी देसाई यांना झापलं. यावरच न थांबता सोनावणेनी थेट मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले. सोनावणे यांच्या या वक्तव्यावर जय मल्हार क्रांती संघटनेने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे.
तर दुसरीकडे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना थेट शिवीगाळ केली आहे. हनी ट्रॅप प्रकरणात एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली पण या पत्रकार परिषदे मध्ये त्यांचा तोल सुटला. ‘एकनाथ खडसे मातब्बर नव्हे तर भिxxxx नेता असल्याचे म्हणत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी यांनी जिव्हारी लागणारी टीका केली. इतकंच नाहीतर एकनाथ खडसे हे वैफल्यग्रस्त आहेत. ते महाजनांची बरोबरी करूच शकत नाही’, असेही मंगेश चव्हाण यांनी म्हटलं होतं.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

