बाळासाहेबांवरचं हे बेगडी प्रेम
Shivsena MLA Sunil Raut Comment Rebel MLA Shinde Group
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर आमदार सुनील राऊत यांनी त्यांचे हे प्रेम बेगडी असल्याचे सांगितले. जगाला दाखवण्यासाठी ही नाटकं ते करत असले तरी ज्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार ज्यांनी केले आहे, ते सध्या बेगडी प्रेम दाखवत असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या रुपात बघतो त्यामुळे हे त्यांचे बेगडी प्रेम जगाला माहिती आहे असंही त्यांनी सांगितले.
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?

