Kolhapur Maratha Protest | आंबेडकर, शाहू महाराजांच्या वंशजांनी आरक्षणाचं रणशिंग फुंकलं: धर्यशील माने

मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा कोल्हापुरात निघाला. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यावेळी सलाईन लावून मराठा मोर्चात सहभागी झाले.

मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा कोल्हापुरात निघाला. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यावेळी सलाईन लावून मराठा मोर्चात सहभागी झाले. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं, असं आवाहन मानेंनी मोर्चाच्या सुरुवातीला भाषणातून केलं.

खासदार धैर्यशील माने यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही अशक्तपणा असल्याने ते घरात उपचार घेत होते. 10 दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रकृती नाजूक असतानाही ते सलाईन लावून सहभागी झाले. कोल्हापुरात आज जोरदार पाऊस कोसळत आहे. मोठ्या पावसातही हा मराठा मोर्चा निघत आहे. मानेही पावसाची पर्वा न करता मोर्चात सहभागी झाले.