AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ठाकरे संकटात सापडले की त्यांची गुणवत्ता उफाळून येते, शत्रूला अधिक घातक ठरतात’

‘ठाकरे संकटात सापडले की त्यांची गुणवत्ता उफाळून येते, शत्रूला अधिक घातक ठरतात’

| Updated on: Jun 20, 2021 | 10:57 AM
Share

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील रोखठोक या सदरातून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा, यामधील अंतर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यकर्ता किंवा राजा याची पुंगी वाजवणे ही काही देशभक्ती नाही.

ठाकरे घराण्यातील लोक संकटात सापडले की त्यांची गुणवत्ता अधिक उफाळून येते. ते शत्रूला अधिक घातक ठरतात, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील रोखठोक या सदरातून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा, यामधील अंतर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यकर्ता किंवा राजा याची पुंगी वाजवणे ही काही देशभक्ती नाही. चुका करणाऱ्य़ा राजाला सत्य, परखड बोल सुनावणे ही खरी राष्ट्रनिष्ठा असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (Shivsena Saamana rokhthok MP Sanjay takes a dig at BJP)