Breaking | कश्मीरची ढाल, इम्रान खान के हसीन सपने, सामनाच्या अग्रलेखातून पाकिस्तानवर निशाणा

आता पाकिस्तानकडील अण्वस्त्र सामर्थ्याचा मुद्दा समोर आला आहे. अशा वेळी इम्रान खान यांनी कश्मीरची ढाल पुढे करणे अपेक्षितच होते. पण हिंदुस्थानसाठी काश्मिर हा प्रश्न कुठे आहे?, असा सामनातून म्हटलं आहे.

Rohit Dhamnaskar

|

Jun 23, 2021 | 8:47 AM

आजच्या सामना अग्रलेखातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा काश्मिरप्रश्नावरुन जोरदार समाचार घेण्यात आलाय. पाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ही अयशस्वी ठरली आणि त्यामुळे इम्रान खान यांचे तोंड ‘आंबट’च राहिले. तसंच अमेरिकेची इच्छा आणि संकल्प यानुसार काश्मिर प्रश्न सुटावा या पाकच्या साक्षात्काराला ‘इम्रान खान के हसीन सपने’ यापेक्षा वेगळे काय म्हणता येईल?, असा सणसणीत टोलाही लगावण्यात आलाय.

पाकिस्तान सध्या राजकीय, आर्थिक, सामाजिक अराजकाच्या खाईत सापडला आहे. कर्जाच्या प्रचंड बोजाखाली दबला गेला आहे. जागतिक स्तरावर त्याची पत प्रचंड खालावली आहे. ती सावरण्यासाठी इम्रान खान यांनी केलेली ‘मँगो डिप्लोमसी’ही अयशस्वी ठरली आणि त्यामुळे इम्रान खान यांचे तोंड ‘आंबट’च राहिले. त्यात आता पाकिस्तानकडील अण्वस्त्र सामर्थ्याचा मुद्दा समोर आला आहे. अशा वेळी इम्रान खान यांनी कश्मीरची ढाल पुढे करणे अपेक्षितच होते. पण हिंदुस्थानसाठी काश्मिर हा प्रश्न कुठे आहे?, असा सामनातून म्हटलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें