Kunal Kamra : ‘ठाणे, रिक्षा, चश्मा..’, पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
Kunal Kamra Controversy News : पुण्यात ठाकरे गटाकडून कुणाल कामरा याच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. हे बॅनर पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पुण्याच्या अलका चौकात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं व्यंगचित्र लावण्यात आलेलं आहे. त्याखाली ”ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का?” असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत कुणाल कामरा याचं देखील या बॅनरवर व्यंगचित्र काढण्यात आलेलं आहे.
कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना शिंदे गटावर तयार केलेल्या वादग्रस्त गाण्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपण कुणाल कामराच्या सोबत असल्याचं पत्रकारांशी बोलताना म्हंटलं होतं.
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!

