अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर ठाकरेगटाची नवी रणनिती; 1 मार्चला मोठी घडामोड
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ही मैदानात उतरणार आहेत. पाहा व्हीडिओ...
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ही मैदानात उतरणार आहेत. खासदार संजय राऊत 1 मार्चला कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसंग्राम अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा होणार आहे. यात ते एक मार्चला कोल्हापुरात असतील. एक मार्चला कोल्हापुरात पदाधिकारी बैठकांसह कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. अमित शाह यांनी कोल्हापुरात उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपाला संजय राऊत कोल्हापुरातचं मेळावा घेऊनच उत्तर देणार आहेत. त्यामुळे राऊत काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष असेल.
Published on: Feb 21, 2023 09:39 AM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

