Dombivli | डोंबिवलीत 1 रुपयाला पेट्रोल, आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून माफक दरात पेट्रोल वाटप केले जात आहे. | Aditya Thackeray

 

राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून माफक दरात पेट्रोल वाटप केले जात आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांची चांगलीच चांदी झाली आहे. डोंबिवलीच्या उस्मा पेट्रोल पंपावर अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे. सध्या मुंबईसह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 100 रुपयांच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्या आहेत. (One liter petrol in one rupees in Dombivli)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI