Dharashiv : आई नव्हे ही तर कैदासिन… पोटच्या गोळ्याचा 10 हजारात सौदा अन्… संतापजनक प्रकार कुठला?
धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आल्याने सर्वच हादरले आहे. जन्म देणाऱ्या आईकडूनच पोटच्या मुलाची विक्री केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच चक्क आपल्या पोटच्या बाळाला बाजारात विकल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील बालकाला दहा हजारात विक्री केल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर दत्तक प्रक्रिया आणि करारनामा करून कैदासिन आईने आपल्या बाळाचा सौदा केल्याची माहिती आहे. दरम्यान, बाळाची आजी आणि समाजिक कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 100 रूपयाच्या बॉण्ड पेपरवर बेकायदेशीर दत्तक प्रक्रिया आणि करारनामा करून आईनेच मुलाला विकल्याची धक्कादायक घटना धाराशिवच्या मुरूम येथे घडली. यानंतर बालकाच्या आजीने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर आता याप्रकरणी मुलाच्या आईसह सात जणांवर धाराशिवच्या मुरूम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. विक्री करण्यात आलेला बालक बालकल्याण समितीने शिशुगृहाच्या निगराणीत ठेवला असून त्याच्यावरती धाराशिवच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

