Pandharpur विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान, विठुरायाला वाहिलेले हार थेट कचऱ्यात
पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले हार नगर परिषदेच्या कचरा डोपोत टाकले जात असल्याचा प्रकार उडकीस आला आहे. त्यामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान करण्यात आल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले हार थेट नगर परिषदेच्या कचरा डेपोत फेकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. दररोज दोन टन हारांची विल्हेवाट कचरा डेपोत लावली जात आहे. ज्या ठिकाणी शहरातील सगळा कचरा टाकला जातो त्याच ठिकाणी भाविकांनी श्रद्धेने आणलेल्या हारांची फेकले जात आहे. या प्रकारामुळे भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यासह वाल्मीक संघटनाही आक्रमक झाली आहे.
वाल्मीक संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी हारांपासून धूप, उदबत्ती असे उपपदार्थ तयार करा. नाही जमले तर शिर्डी प्रमाणे विठ्ठल मंदिरात हराला बंदी घाला किंवा भाविकांनी आणलेले हार भाविकांच्या हातात प्रसाद म्हणून देऊन भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखा, अशी मागणी मंदिर समिला केली आहे. जर मागणी मान्य न झाल्यास मंदिर समितीच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.