India-Pak Conflict : पाकचा बुरखा फाटणार, भारताचं पहिलं शिष्टमंडळ आज UAE दौऱ्यावर, ‘सिंदूर’बाबत कोण-कोण मांडणार भूमिका?
ऑपरेशन सिंदूरवर भूमिका मांडण्यासाठी खासदारांची एक टीम परदेशात पाठवण्यात येणार आहे. 7 सर्वपक्षीय नेते विविध शिष्टमंडळांचं नेतृत्व करणार असून ही खासदारांची टीम ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडणार आहे.
पाकिस्तानचा बुरखा लवकरच टराटरा फाटणार आहे. कारण आज भारताचं पहिलं शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर जाणार आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील हे शिष्टमंडळ असून आज UAE साठी ते रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर श्रीकांत शिंदे यांचं हे शिष्टमंडळ UAE सह लायबेरिया, काँगो, सिएरा लिओनचा या देशाचा दौरा करणार आहेत. तर उद्या भारताचे आणखी दोन शिष्टमंडळ परदेश दौऱ्यासाठी निघणार आहेत. संजय झा आणि कनिमोझींच्या नेतृत्वातील हे दोन शिष्टमंडळ असून ते उद्या परदेश दौऱ्यावर निघणार आहेत. आज दौऱ्यासाठी निघालेल्या शिष्टमंडळात श्रीकांत शिंदेंसह बासुरी स्वराज, ईटी मोहम्मद बशीर, अतुल गर्ग, सस्मित पात्रा, मनन कुमार मित्रा, एसएएस अहलुवालिया, सुजन चिनॉय यांचा यामध्ये समावेश असणार आहे.