वैफल्यग्रस्त झाल्यामुळे संजय राऊत अशी विधानं करत आहेत- श्रीकांत शिंदे

रविवारी सकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. गुवाहाटीहून 40 आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील आणि त्यांचं शवविच्छेदन होईल, असं विधान राऊत यांनी केलं. त्यावरून मोठा वाद सुरू झाला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 27, 2022 | 1:32 PM

“ही बंडखोरी नाही. महाराष्ट्राच्या जनतेला जे अपेक्षित आहे, ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे घडतंय ते महाराष्ट्राची आणि हिंदुस्तानची जनता बघतेय. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यांनी पोकळ धमक्या दुसऱ्यांना जाऊन दिल्या पाहिजेत. वैफल्यग्रस्त झाल्यामुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत,” अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दिली आहे. रविवारी सकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. गुवाहाटीहून 40 आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील आणि त्यांचं शवविच्छेदन होईल, असं विधान राऊत यांनी केलं. त्यावरून मोठा वाद सुरू झाला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें