AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : भक्ष्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला आणि……

| Updated on: Mar 09, 2021 | 2:44 PM
Share

भक्ष्याच्या शोधात असणारा बिबट्या भरवस्तीतील विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. (Sindhudurg Leopard Fell into the well)

सिंधुदुर्ग : भक्ष्याच्या शोधात असणारा बिबट्या भरवस्तीतील विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. सिंधुदुर्गातील वेंगुर्ला परुळे बाजार या ठिकाणी ही घटना घडली आहे. यानंतर वनविभागाने त्या बिबट्याची सुटका करण्यात आली आहे. (Sindhudurg Leopard Fell into the well)

सिंधुदुर्गातील वेंगुर्ला परुळे बाजार येथील मनोहर सामंत यांच्या घराजवळील विहिरीत पहाटेच्या सुमारास बिबट्या पडला होता. भक्ष्याच्या शोधात असणारा हा बिबट्या भरवस्तीतील एका विहिरीत पडला. ही माहिती गावात पसरताच त्याला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली.  गेल्या काही दिवसांपासून परूळे परिसरात या बिबट्याची मोठी दहशत होती. अनेक पाळीव प्राण्यावर बिबट्याने हल्ले केले होते. हा बिबट्या तीन वर्षे वयाचा आहे. तसेच तो नर जातीचा असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

दरम्यान बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. यानंतर वनविभागाची टीम परुळे येथे दाखल झाली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद केलं. (Sindhudurg Leopard Fell into the well)

Published on: Mar 09, 2021 02:42 PM