सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव ‘या’ कारणासाठी दोन दिवस बंद राहणार
कांद्याच्या वाढलेल्या आवकनंतर आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव दोन दिवस बंद राहणार आहे. पाहा व्हीडिओ...
कांद्याच्या वाढलेल्या आवकनंतर आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव दोन दिवस बंद राहणार आहे. व्यापारी, माथाडी कामगार आणि अडते यांच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. काल 750 आणि आज जवळपास 600 गाडी कांद्याची आवक सोलापूरच्या बाजारात झाली आहे . दोन दिवस झालेल्या मोठ्या आवकमुळे उद्या बाजार समितीमधील लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. परवा 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीला शासकीय सुट्टी आहे. आज सोलापूरच्या बाजार समितीतील लिलाव दुपारी तीन वाजता सुरु होणार असल्याची माहिती आहे.
Latest Videos
Latest News