AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे-फडणवीसांची दिल्लीत काय खलबतं? सहकारावरील काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व मोडीत निघणार? अमित शहांची रणनीती काय?

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची महाराष्ट्रातील सहाकाराबाबत नेमकी काय रणनीती ठरते, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

शिंदे-फडणवीसांची दिल्लीत काय खलबतं? सहकारावरील काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व मोडीत निघणार? अमित शहांची रणनीती काय?
Image Credit source: social media
| Updated on: Jan 24, 2023 | 1:06 PM
Share

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) ही जोडगोळी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील (Delhi) बैठकांमध्ये नेमकी काय खलबतं सुरू आहेत, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी लवकरच धडकणार की आणखी काही घडामोडी घडणार, यावरून चर्चा झडत आहेत. शिंदे -फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी दिल्लीत जोरदार खलबतं सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत याविषयी महत्त्वाची बैठक सुरु आहे.

पंकजा मुंडेही दिल्लीत…

महाराष्ट्राच्या सहकार उद्योगावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची पकड आहे. ही वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजप आगामी काळात मोठी खेळी करणार असल्याचं म्हटलं जातंय. यासाठी राज्यातील साखर उद्योगातील बडे नेतेदेखील आज दिल्लीत उपस्थित आहेत. यात मराठवाड्यातील पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासह धनंजय महाडीक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेदेखील उपस्थित आहेत.

दुपारी चार वाजता बैठक…

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची महाराष्ट्रातील सहाकाराबाबत नेमकी काय रणनीती ठरते, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. अमित शाह यांच्या नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात दुपारी चार वाजता ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सहकार धोरणाचे विधेयक, सहकारातील मल्टीस्टेट कायदा, देशभरातील साखर धोरण यासंबंधी महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत मांडले जाण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी दिल्लीतून…?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दौऱ्यावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारावरही या दौऱ्यात मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाचे आमदार दिल्लीकडे डोळे लावून बसले आहेत. तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तसेच संजय शिरसाट यांनी पुढील काही तासात मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी धडकू शकते, असा दावाही केला आहे. त्यामुळे इच्छुकांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या दिल्लीच्या दिशेने लागलं आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.