बाळासाहेबांना लॉकरमध्ये बंद केलं होतं, आम्ही त्यांना बाहेर काढतोय… उद्धव ठाकरे, अंबादास दानवेंना कुणी सुनावलं?

मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 12:30 PM

शिवसेनावाल्यांनी बाळासाहेबांना लॉकर मध्ये बंद केलं होतं. आम्ही त्यांना लॉकरमधून बाहेर काढून त्यांचं मंदिर बनवत आहोत, असं वक्तव्य आमदाराने केलंय.

बाळासाहेबांना लॉकरमध्ये बंद केलं होतं, आम्ही त्यांना बाहेर काढतोय... उद्धव ठाकरे, अंबादास दानवेंना कुणी सुनावलं?
Image Credit source: social media

दत्ता कनवटे, औरंगाबादः शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेतील दोन गटातील संघर्ष अधिकच उफाळून आलाय. बाळासाहेब ठाकरेंचं नाव तुम्ही वापरू शकत नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलंय. यावरून शिंदे गटाच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादेत ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यामध्येही बाळासाहेबांच्या नावावरून चांगलीच जुंपली. अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांना आव्हान दिलं. तर संजय शिरसाट यांनीही दानवेंना चांगलंच सुनावलंय..

संजय शिरसाट म्हणाले, अंबादास दानवे आणि या लोकांना राजकारण कळतं का हा प्रश्न आहे. माझं थोबाड फोडण्याचं स्टेटमेंट कळलं नसेल म्हणून ते बोलत असावेत..

बाळासाहेबांना लॉकरमध्ये बंद केलं होतं…

शिवसेना ठाकरे गटावर आरोप करताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ बाळासाहेबांमुळे आम्ही आहोत. पण शिवसेनावाल्यांनी बाळासाहेबांना लॉकर मध्ये बंद केलं होतं. आम्ही त्यांना लॉकरमधून बाहेर काढून त्यांचं मंदिर बनवत आहोत…

बाळासाहेबांचा फोटो आम्हाला वापरू नका म्हणता.. मग शिवाजी महाराज तुमचे कोण होते? बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेता.. ते तुमचे कोण होते? तरीही तुम्ही त्यांचं नाव घेता.. मग बाळासाहेब हेदेखील संपूर्ण देशाचे होते, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय.

मुंबईवर शिवसेना-भाजपचा झेंडा…

मुंबई महापालिका निवडणुकीत शिदें गट आणि भाजप युतीचा विजय होणार असा दावा शिरसाट यांनी केलाय. ते म्हणाले, ‘ मुंबईत नदी, नाले स्वच्छ करण्याच्या नावाखाली घोटाळा व्हायचा.. आम्हाला ते बंद करायचं आहे.. मुंबई महापालकेवर शिवसेना भाजपचा झेंडा फडकणार आहे.

मी आणि माझी दुकानदारी…

उध्दव ठाकरे यांचा ठरलेला कार्यक्रम म्हणजे, माझी मुंबई, मी आणि माझी दुकानदारी सुरू होती, असा थेट आरोप संजय शिरसाट यांनी केलाय.

नेता आहे की जोकर?

संजय राऊत जेलमध्ये गेल्यापासून डोक्यावर पडला आहे. आम्ही 40 दगडांनी शिवसेनेचा सेतू बांधला होता हा सेतू संजय राऊत याने पडला आहे.. संजय राऊत नेता आहे की जोकर हेच कळत नाही, अशी बोचरी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच?

महाराष्ट्रातील वेगळ्या कामासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत, पण त्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय निघू शकतो, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI