AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur : मंगळवेढ्यात मृत्यूचा थरार, प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव; दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अन्...

Solapur : मंगळवेढ्यात मृत्यूचा थरार, प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव; दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अन्…

| Updated on: Jul 16, 2025 | 1:54 PM
Share

एखाद्या हॉरर चित्रपटाला लाजवेल अशी मृत्यूची थरारक घटना सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यात घडली आहे. मंगळवेढ्यातील पाटकळमध्ये एका विवाहितेचा जळीत अवस्थेतील मृतदेह सापडला. याबाबत पोलीस तपास झाला मात्र यानंतर प्रत्यक्ष संबंधित विवाहित महिला जिवंत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अशी कुबली प्रियकराने पोलिसांसमोर दिली. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ गावातील धक्कादायक घटना समोर आली आहे. वेडसर महिलेची हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांच्या पत्नी किरण राहत होते. 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरणने आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली.

यानंतर किरणचा नवरा नागेश हा पत्नी वियोगाने रडत होता. त्याचवेळी किरणचे वडील देखील घटनास्थळी पोहोचले. किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही. तात्काळ किरणच्या वडिलांनी पोलिसांना आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्याची विनंती केली. किरणने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये मृत्यू पावलेली आहे असं समजत असलेली किरण कराडमध्ये एका तरुणांसोबत राहत असल्याचे आढळून आले. याबाबत किरण आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाची सध्या पोलीस चौकशी करत आहेत.

Published on: Jul 16, 2025 01:54 PM