महाविकास आघाडी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोर्चा
सोलापूरमध्ये काँग्रेसच्या खाजदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी जणआंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.या आंदोलन दरम्यान ग्रामिण भागातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग झाल्याचे दिसून आले.
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मोर्चाचे आयोजन केले. विशेष म्हणजे या मोर्चाला शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारकडून हा मोर्चा काढण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून प्रणिती शिंदे या सरकारच्या विरोधात चांगल्याच आक्रमक होताना दिसत आहेत. रेशन दुकानावर प्लॅस्टिकचे तांदुळ आल्याचाही दावा काही दिवसांपूर्वीच प्रणिती शिंदे यांनी केला होता. सरकारवर गंभीर आरोप करताना प्रणिती शिंदे या दिसल्या. आता मोठ्या मोर्चाचे देखील आयोजन त्यांनी केले आहे.
Latest Videos
Latest News