AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नको असणारं मंत्रिपद दिलंय, पालकमंत्रिपदही हव्या 'त्या' जिल्ह्याचं दिलं नाही; शिवसेनेच्या मंत्र्याची नाराजी उघड

नको असणारं मंत्रिपद दिलंय, पालकमंत्रिपदही हव्या ‘त्या’ जिल्ह्याचं दिलं नाही; शिवसेनेच्या मंत्र्याची नाराजी उघड

| Edited By: | Updated on: Mar 29, 2023 | 9:34 AM
Share

Tanaji Sawant on Health Ministry : सोलापूरचे पालकमंत्री पदावरून आणि खाते वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्याने नाराजी व्यक्त केली आहे. पाहा संपूर्ण व्हीडिओ...

पंढरपूर : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. मात्र त्याआधीच सोलापूरच्या पालकमंत्रिपदाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. “सोलापूरचं पालकमंत्रिपद माझ्याकडे हवं होतं. मात्र धाराशिव आणि परभणीचे पालकमंत्री पद आपल्याला दिलं गेलं, असं वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. सोलापूरचा पालकमंत्री असतो तर सावंत काय निधी देऊ शकतात हे सोलापूरकरांनी पाहिलं असतं. पण आता जर निधी मिळत नसेल तर माझ्या भैरवनाथ शुगरमधून विकासाला पैसे देऊ का?, असं तानाजी सावंत म्हणाले आहेत. सत्ता बदलानंतर आपणास आरोग्य खातं दिलं मात्र आपल्याला आरोग्य खातं पसंत नव्हतं. मी नाराज होतो पण तरीही सेवाभावी वृत्तीने काम करतोय. आता हे खातंही आवडायला लागलंय, असंही सावंत म्हणाले आहेत.

Published on: Mar 29, 2023 09:30 AM