Special Report | राज ठाकरेंना अडकवण्यासाठी सापळा कुठं रचला ? मुंबई, दिल्ली की युपी ? -tv9

राज ठाकरेंविरोधात कोण सापळा रचत होतं? अयोध्येत बोलवून राज ठाकरेंना नेमकं कोण अडकवू पाहत होतं? मुंबई-दिल्लीतून बृजभूषण सिंहांना कुणी रसद पुरवली? यावर राज ठाकरेंनी कुणाचंही नाव घेतलं नाही., मात्र त्यांच्या एका वाक्याचा रोख कधी भाजपकडे वाटला, आणि नंतरच्या शब्दाचा रोख अप्रत्यक्षपणे मविआ सरकारकडे...राज ठाकरेंनी सर्व सांगितलं., फक्त कुणाचंही नाव सांगितलं नाही.

दादासाहेब कारंडे

|

May 22, 2022 | 10:15 PM

आज या साऱ्या टीकांवर सणसणाटी उत्तरांची अपेक्षा होती. मात्र राज ठाकरेंच्या भाषणानं वेगळाचसस्पेन्स तयार केला. तो सस्पेन्स म्हणजे अयोध्या दौरा हा माझ्याविरोधात एक सापळा असल्याचा राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप. राज ठाकरेंविरोधात कोण सापळा रचत होतं? अयोध्येत बोलवून राज ठाकरेंना नेमकं कोण अडकवू पाहत होतं? मुंबई-दिल्लीतून बृजभूषण सिंहांना कुणी रसद पुरवली? यावर राज ठाकरेंनी कुणाचंही नाव घेतलं नाही., मात्र त्यांच्या एका वाक्याचा रोख कधी भाजपकडे वाटला, आणि नंतरच्या शब्दाचा रोख अप्रत्यक्षपणे मविआ सरकारकडे…राज ठाकरेंनी सर्व सांगितलं., फक्त कुणाचंही नाव सांगितलं नाही. पण त्यावरुन मविआ आणि भाजपवाले एकमेकांकडे बोट दाखवतायत. काँग्रेस म्हणतंय की राज ठाकरेंविरोधात महाराष्ट्रातून यूपीच्या बृजभूषणसिंहाना रसद पुरवणारे फडणवीसच होते, भाजप मात्र हा दावा फेटाळतंय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें