Special Report | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे. कारण देशमुखांच्या वकिलांना आणि स्वत:च्याच एका अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अटक झालेले देशमुखांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी अशी त्यांची नावं आहेत. देशमुखांच्या प्रकरणात कथित चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आता या दोघांनाही दिल्लीतील कोर्टानं दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे. कारण देशमुखांच्या वकिलांना आणि स्वत:च्याच एका अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अटक झालेले देशमुखांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी अशी त्यांची नावं आहेत. देशमुखांच्या प्रकरणात कथित चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आता या दोघांनाही दिल्लीतील कोर्टानं दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बाहेर आलेला अहवाल खरा आहे की खोटा? तो अहवाल खोटा आहे हे सीबीआय अजून नाकारत नाही. त्यामुळे सीबीआयचा किंवा ईडीचा वापर हा केवळ महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. दरम्यान, देशमुखांच्या वकिलांना अटक करण्यापूर्वी सीबीआयने देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी यांनाही काल रात्री ताब्यात घेतलं होतं. पण काही तासातच त्यांची सुटका करण्यात आली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI