Special Report | महाराष्ट्रात हल्ला, दिल्ली दरबारी ‘कल्ला’-tv9
शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर सोमय्यांनी दिल्ली दरबारी आपलं गाऱ्हाणं मांडलंय. केंद्रीय गृहसचिवांशी सोमय्यांनी २० मिनिटं चर्चा केली. यात सोम्मयांच्या टार्गेटवरपहिलं नाव होतं मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे. आणि दुसरं म्हणजे ठाकरे सरकार, सोमय्यांनी त्यांच्या तक्रारीत गंभीर आरोप केलेत.
शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर सोमय्यांनी दिल्ली दरबारी आपलं गाऱ्हाणं मांडलंय. केंद्रीय गृहसचिवांशी सोमय्यांनी २० मिनिटं चर्चा केली. यात सोम्मयांच्या टार्गेटवरपहिलं नाव होतं मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे. आणि दुसरं म्हणजे ठाकरे सरकार, सोमय्यांनी त्यांच्या तक्रारीत गंभीर आरोप केलेत. पहिला आरोप म्हणजे हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी संबंधित परिसराचं सीसीटीव्ही फुटेज गायब केलं. दुसरा आरोप सरकारच्या सांगण्यावरुनच माझ्या नावानं खोटी एफआयआर दाखल झाली.आणि तिसरा हल्ल्यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवलं नाही. एकीकडे सोमय्यांनी दिल्लीवारी केली.. आणि दुसरीकडे फडणवीसांनी गृहसचिवांना पत्र लिहून महाराष्ट्रातल्या कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवलं. फडणवीसांच्या पत्रात एकूण १० मुद्दे आहेत. ज्यात ठाकरे सरकार सुडानं वागत असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय.
केंद्रीय गृहमंत्रालयानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात दिल्लीचं एक पथक चौकशीसाठी महाराष्ट्रात येऊ शकतं. ज्यावर पोलीस आयुक्त म्हणून संजय पांडेंना आरोपांवरची उत्तरं द्यावी लागतील. दुसरी गोष्ट म्हणजे सोमय्यांना केंद्रीय गृहखात्यानं झेड सुरक्षा दिलीय. स्वतः किरीट सोमय्या ते वारंवार सांगतात. सोमय्यांवर याआधी वाशिममध्ये हल्ला झाला होता.यामागचं कारण बेछूट आरोपांचं दिलं गेलं. त्यानंतर पुण्यात हल्ला झाला.पुणे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपच्या घोटाळ्यांवर सोमय्या काल बोलत नाहीत, त्याची कागदपत्रं देऊनही ते गप्पा का आहेत, यावरुन झालेला वाद नंतर हल्ल्यापर्यंत गेला. आणि नंतर खारघरमध्ये सोमय्यांवर हल्ला झाला.
आयएनएस घोटाळ्यातील आरोपी दुसऱ्या एका आरोपीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये का येतो, यावरुन शिवसैनिकांनी सोमय्यांवर हल्ला केला. पुण्यातल्या हल्ल्यांनंतरही सोमय्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार केली होती. मात्र त्याचं पुढे काय झालं., हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र गेल्या काही दिवसात भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. नंतर भाजपच्या पोलखोल रथाची तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. या तिन्ही घटनांवरुन सोमय्या ठाकरे सरकारला आणि ठाकरे सरकार केंद्र सरकारला आव्हान देतंय.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

