Special Report | देवेंद्र फडणवीसांच्या टार्गेटवरील दुसरा वाझे कोण?

‘मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे’, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला सरकार म्हणता येईल का? असा सवालही त्यांनी केलाय.

पोलीस विभागातील वाझे तर सापडला, पण अन्य विभागातील वाझेचा पत्ता आम्हाला लागला. म्हणून पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केलाय. ‘मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे’, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला सरकार म्हणता येईल का? असा सवालही त्यांनी केलाय. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना, शेतकरी, मराठा, ओबीसी आरक्षण, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI