आई वडिलांनी ‘या’ आजारामुळे अनाथालयात सोडलं, आता आहे जगातील टॉपची मॉडेल

आई वडिलांनी 'या' आजारामुळे अनाथालयात सोडलं, आता आहे जगातील टॉप मॉडेल

मुंबई : आई वडिलांचं आपल्या मुलांवर फार प्रेम असतं. आपल्या मुलांसाठी दुनियेविरोधात लढण्यासाठीही तयार असतात. मात्र विश्वात टॉप मॉडेल म्हणून ओळख असणारी ज्वेली एबिनला लहानपणीच तिच्या आई वडिलांनी अनाथालयात सोडलं. ज्वेलीला एल्बिनिज्म नावाचा आजार आहे. त्यामुळे तिला अनाथालयात सोडल्याचे म्हटलं जातंय. मात्र, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज ती विश्वातील टॉप मॉडेलपैकी एक आहे. ती फक्त 16 वर्षांची आहे. ज्या आजारामुळे ज्वेलीला आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही. त्याच आजारामुळे तिला चांगले पैसे आणि प्रसिद्धी मिळाली आहे. वोग नावाच्या फॅशन मॅगझीनमध्येसुद्धा ज्वेली झळकली आहे. अनेक मोठ्या डिझायनरने तिला एंबेसॅडर म्हणून निवडले आहे.