AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | नवाब मलिक यांच्या मुलीचे ईडीला सवाल !

Special Report | नवाब मलिक यांच्या मुलीचे ईडीला सवाल !

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 10:36 PM
Share

महाविकास आघाडीतले सारेच पक्ष भाजपवर तुटून पडतायत. तर भाजपकडून अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घालणार का, असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. याचे पुढे काय होईल, ते येणारा काळच ठरवेल. मात्र, नवाब मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी काल सकाळी कधी पोहचले, त्यांनी कशी चौकशी केली आणि त्यांची अटकेची पद्धत कशी होती, याबद्दल प्रथमच मलिक यांच्या मुलगी निलोफर खान यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या ईडी अटकेवरून महाराष्ट्रातील राजकीय लढाई तीव्र झाली आहे. महाविकास आघाडीतले सारेच पक्ष भाजपवर तुटून पडतायत. तर भाजपकडून अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घालणार का, असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. याचे पुढे काय होईल, ते येणारा काळच ठरवेल. मात्र, नवाब मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी काल सकाळी कधी पोहचले, त्यांनी कशी चौकशी केली आणि त्यांची अटकेची पद्धत कशी होती, याबद्दल प्रथमच मलिक यांच्या मुलगी निलोफर खान यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कधी पोहचले घरात?

सकाळी सहा वाजलेले. आम्ही यावेळेस नमाजसाठी झोपेतून लवकर उठतो. माझी आईही नमाजच्या प्रार्थनेसाठी लवकर उठवली होती. मात्र, तितक्यात दरवाजाची घंटी वाजली. त्यांनी दरवाजा उघडला. तर ईडीचे अधिकारी हजर होते. त्यांनी आपली ओळख सांगितली. आईने ही माहिती वडिलांना जाऊन दिली. ईडीचे अधिकारी आल्याचे सांगितले. आम्ही त्यांना बसायला सांगितले. मात्र, त्यांनी आमच्याकडे सर्च वॉरंट असल्याचे सांगितले. त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची विनंती केली. त्यांनी घरात शोधाशोध केली.