Special Report | समीर वानखेडेंच्या निकाहाचं नेमकं सत्य काय ?

समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या तेव्हाही हिंदू होते, आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत त्यांचं लग्न झालं, त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो” असं क्रांती रेडकर म्हणाल्या.

मुंबई : NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला आहे, त्यानंतर समीर वानखेडेंच्या दुसऱ्या पत्नी आणि प्रख्यात मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी दावे फेटाळून लावत त्यांनी माहिती घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “निकाहनाम्याचे पेपर सासूबाईंनी बनवले होते, ज्या मुस्लीम होत्या. मात्र माझा नवरा आणि सासऱ्यांशी त्याचा काहीही संबंध नाही. समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या तेव्हाही हिंदू होते, आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत त्यांचं लग्न झालं, त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो” असं क्रांती रेडकर म्हणाल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI