Special Report | उद्धव, मदत कर, मी तुझी शिक्षिका बोलतेय, CM Uddhav Thackeray यांना आर्त हाक

वादळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या शिक्षिकेचंही मोठं नुकसान झालं आहे.

Special Report | उद्धव, मदत कर, मी तुझी शिक्षिका बोलतेय, CM Uddhav Thackeray यांना आर्त हाक
| Updated on: May 26, 2021 | 11:33 PM

तौत्के चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) महाराष्ट्रातही मोठं नुकसान झालं आहे. कोकणासह मुंबई उपनगरालाही तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या शिक्षिकेचंही मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या तिन्ही बड्या नेत्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे (Suman Randive) या 90 वर्षांच्या आहेत. सुमन सध्या वृद्धाश्रमात आहेत. मात्र वसईतील या वृद्धाश्रमाला तोत्के वादळाचा फटका बसला. आता या वृद्धाश्रमाला मदत मिळावी, अशी मागणी या शिक्षिकेने आपले विद्यार्थी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. (Special report on teacher of CM Uddhav Thackeray Suman teacher)