Special Report | गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदेंनी पुन्हा डिवचलं, ते ट्विट चर्चेत-tv9
शिंदेंनी बंड पुकारलं पण ते स्वत:च्या गटालाच शिवसेना म्हणत आहेत. आणि बाळासाहेबांनाच गुरु माणून, त्याचाच विचार पुढे नेत असल्याचा दावाही करतायत. त्यामुळं ठाकरेंसोबतचा संघर्ष तात्काळ संपेल असंही चित्र दिसत नाही.
गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पुन्हा शिंदे आणि शिवसेना आमनेसामने आलीच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच आधी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेला इशारा दिला. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. अंगार कधीच विझणार नाही. हिंदुत्वाशिवाय विचार नाही, गुरुपौर्णिनिमित्त विनम्र अभिवादन, असं ट्विट शिंदेंनी केलं. सकाळीच ट्विट केल्यानंतर शिंदे, दादरमधल्या बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी आले..आणि त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळंच मुख्यमंत्री झाल्याचं शिंदे म्हणाले. तर बाळासाहेबांनी आपल्या स्टाईलमध्ये शिंदे गटाचा समाचार घेतला असता असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेतल्यानंतर शिंदे ठाण्यात आले..ठाण्यातल्या आनंद आश्रमात आनंद दिघेंना मुख्यमंत्री शिंदेंनी अभिवादन केलं. बंड पुकारल्यानं शिंदे गट शिवसेना नेत्यांच्या टार्गेटवर आलाय. तर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आणि उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याची विनंती केली. शिंदेंनी बंड पुकारलं पण ते स्वत:च्या गटालाच शिवसेना म्हणत आहेत. आणि बाळासाहेबांनाच गुरु माणून, त्याचाच विचार पुढे नेत असल्याचा दावाही करतायत. त्यामुळं ठाकरेंसोबतचा संघर्ष तात्काळ संपेल असंही चित्र दिसत नाही.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

