Special Report | यूक्रेनचा रिल आणि रियल नायक… वोलोदिमीर जेलेंस्की

Special Report | यूक्रेनचा रिल आणि रियल नायक… वोलोदिमीर जेलेंस्की

| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 11:26 PM

यहूदी धर्मात जन्माला आलेले वोलोदिमीर जेलेंस्की यांचा जन्‍म 25 जानेवरी, 1978 ला यूक्रेन मध्ये झाला. यांचे वडील ऑलेक्‍जेंडर जेलेंस्की प्रोफेसर आणि आई रायमा जेलेंस्का पेशाने इंजीनियर होत्या. सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर वोलोदिमीर जेलेंस्की यांना इजराइल मध्ये अभ्यास करण्याकरता स्कॉलरशिप मिळाली परंतु वडिलांची परवानगी न मिळाल्या कारणामुळे वोलोदिमीर यांनी कीव येथून आपले शिक्षण पूर्ण केले.

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये भीषण युद्ध चालू आहे. या युद्धाची झळ दोन्ही देशाला बसत आहे. हल्ला झाल्यानंतर 24 तास उलटून गेले आहेत. असे असून सुद्धा यूक्रेनचे राष्‍ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की हे रशिया समोर नतमस्तक झाले नाहीये. या घटनेबद्दल जेलेंस्की यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगीतले की, शत्रूंनी मला सर्वात पहिला टारगेट बनवला आहे. यानंतर माझ्या कुटुंबीयांना टारगेट केले जाईल. जेलेंस्की यांचे म्हणणे आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ परंतु ते हार मानायला आम्ही तयार नाहीत. जेलेंस्की ट्वीट च्या माध्यमातून आपले प्रत्येक महणणे देशातील जनता आणि जगापर्यंत पोहोचवत आहेत.

यहूदी धर्मात जन्माला आलेले वोलोदिमीर जेलेंस्की यांचा जन्‍म 25 जानेवरी, 1978 ला यूक्रेन मध्ये झाला. यांचे वडील ऑलेक्‍जेंडर जेलेंस्की प्रोफेसर आणि आई रायमा जेलेंस्का पेशाने इंजीनियर होत्या. सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर वोलोदिमीर जेलेंस्की यांना इजराइल मध्ये अभ्यास करण्याकरता स्कॉलरशिप मिळाली परंतु वडिलांची परवानगी न मिळाल्या कारणामुळे वोलोदिमीर यांनी कीव येथून आपले शिक्षण पूर्ण केले. 2000 मध्ये कीव नेशनल इकोनॉमिक यूनिवर्सिटीद्वारे लॉची डिग्री प्राप्त करून आपले ग्रेजुएशन पूर्ण केले. एक काळ असा होता की, वोलोदिमीर आपल्या कॉमेडी शैलीसाठी प्रसिद्ध होते.याची सुरुवात शिक्षण घेत असताना झाली. ही कला त्यांच्या अंगी आधी होती.याची जाणीव त्यांना शिक्षण घेताना झाली. 1997 मध्ये वोलोदिमीर यांनी काही अभिनेत्यासोबत एकत्र येऊन ‘क्वार्टल 95’ नावाचा एक कॉमेडी ग्रुप बनवला. लोकांनी वोलोदिमीर यांच्या कामाला खूप पसंती दिली. ज्याचा परिणाम इतका झाला की , 2003 मध्ये त्यांनी आपले कार्यक्रम सुरू केले. स्वतः च्याच एका कार्यक्रमातून प्रेरीत होऊन भविष्यात राजकारण क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्याचे त्यांनी ठरवले. अशाप्रकारे त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला.