AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | ईडीच्या नजरेतील राजकीय व्यक्ती संजय राऊत ?

Special Report | ईडीच्या नजरेतील राजकीय व्यक्ती संजय राऊत ?

| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 10:11 PM
Share

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले व्यावसायीक प्रवीण राऊत यांनी एका आघाडीच्या राजकीय नेत्याबरोबर आर्थिक व्यवहार केले आहेत. तसंच अनेक बड्या व्यक्तींसाठी ते अशी कामे करतात असा खळबळजनक दावा बुधवारी विशेष न्यायालयात ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले व्यावसायीक प्रवीण राऊत यांनी एका आघाडीच्या राजकीय नेत्याबरोबर आर्थिक व्यवहार केले आहेत. तसंच अनेक बड्या व्यक्तींसाठी ते अशी कामे करतात असा खळबळजनक दावा बुधवारी विशेष न्यायालयात ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली आहे. प्रवीण राऊत यांना ईडीने 2 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. बुधवारी त्यांना विशेष पीएमएलए कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात आलं होतं. न्यायलयाने त्यांना शुक्रवारपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. आपल्या मुलीच्या लग्नाच्या डेकोरेशनसाठी आलेल्या फूलवाल्याला ईडीच्या लोकांनी उचललं, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्याला धमकावत अंदर डाल देंगे असा इशारा ईडीनं दिला होता, असाही आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात येऊन डेकोरेशनसाठी आलेल्या फूल वाल्याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी नेलं. यानंतर त्याच्याकडे प्रश्न उपस्थित करत त्यांची उलट तपासणी केली. यातून पैशांबाबत त्याला विचारणा करण्यात आली, असा आरोपही राऊत यांनी केलाय.