Special Report | मुंबईत मवाळ असणारे संजय राऊत, पुण्यात जहाल का?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. पहाटेची घटना विसरली आहेत. तुम्हीही विसरून जा. साखर झोपेतील घटना विसरा. अजितदादांना भेटा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. अजितदादा आपली कामं करतील, असं राऊत म्हणाले. सन्मानाने जागा वाटप झालं तर आपण एकत्र लढू, असं सांगतानाच युती, महाविकास आघाडीमध्ये भांड्याला भांड लागणार. हे नको असेल तर 150 जागा निवडून आणा. जो पर्यंत ते होत नाही तोपर्यंत गोड मानून घ्या, असंही राऊतांनी म्हटलंय. संजय राऊत यांचा पुण्यातील हा आक्रमक पवित्रा पाहून मुंबईत मवाळ असलेले राऊत पुण्यात जहाल का बनतात? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय.
पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढणार, असं सांगत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ललकारले. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तुम्ही अजितदादांना भेटा. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असं सांगून शिवतारे यांना बळ दिलं आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी नाही झाली तर शिवतारे आणि अजितदादा यांच्यातील कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. पहाटेची घटना विसरली आहेत. तुम्हीही विसरून जा. साखर झोपेतील घटना विसरा. अजितदादांना भेटा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. अजितदादा आपली कामं करतील, असं राऊत म्हणाले. सन्मानाने जागा वाटप झालं तर आपण एकत्र लढू, असं सांगतानाच युती, महाविकास आघाडीमध्ये भांड्याला भांड लागणार. हे नको असेल तर 150 जागा निवडून आणा. जो पर्यंत ते होत नाही तोपर्यंत गोड मानून घ्या, असंही राऊतांनी म्हटलंय.
बारामतीही आपली आहे. तिकडेही लोक आहेत. पुरंदर जिंकले की बारामतीही आपण जिंकू शकतो. भले बारामतीत आपल्या जागा निवडून येणार नाहीत. पण आपली ताकद तर वाढेल. त्यामुळे आपण आपली ताकद वाढवू शकतो ही सकारात्मकता राहिली पाहिजे, असंही ते म्हणाले.
खासदार संजय राऊत यांचा पुण्यातील हा आक्रमक पवित्रा पाहून मुंबईत मवाळ असलेले राऊत पुण्यात जहाल का बनतात? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

