AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात Twitter वर वार-पलटवार

Special Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात Twitter वर वार-पलटवार

| Edited By: | Updated on: Jan 28, 2022 | 10:40 PM
Share

सर्वोच्च न्यायायलयाने आज अखेर भाजप आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे. तर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यात ट्वीटरवर जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे.

विधानसभेतील भाजपच्या 12 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. विधानसभेत तालिका अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याच्या कारणावरुन या आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायायलयाने आज अखेर भाजप आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे. तर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यात ट्वीटरवर जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे.

विधानसभेतील 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. ‘सत्यमेव जयते! राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार! या निकालाचे आम्ही स्वागत करतो. सातत्याने संविधानाची पायमल्ली करीत तानाशाही पध्दतीने सरकार चालविण्याचा प्रकार मविआ सरकारकडून होत होता, त्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही जोरदार चपराक. लोकशाहीविरोधी, बेकायदा, अवैध, असमर्थनीय प्रकार लोकशाहीत कधीच खपवून घेतले जात नसतात, आज न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले’.