AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | आजी मिसेस सीएम...ते माजी मिसेस सीएम, एका ट्विटचा वाद कुठून कुठपर्यंत जाऊन पोहोचला?

Special Report | आजी मिसेस सीएम…ते माजी मिसेस सीएम, एका ट्विटचा वाद कुठून कुठपर्यंत जाऊन पोहोचला?

| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 11:53 PM
Share

राज्यात एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्यानं भाजप कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच त्याची चौकशीही करण्यात आलीय. तर या प्रकरणावरुनच आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यात नवा वाद उभा राहिलाय. विद्या चव्हाण यांनी टीव्ही 9 […]

राज्यात एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्यानं भाजप कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच त्याची चौकशीही करण्यात आलीय. तर या प्रकरणावरुनच आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यात नवा वाद उभा राहिलाय.

विद्या चव्हाण यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस यांचा डान्सिंग डॉल असा उल्लेख केला होता. हे सर्व प्रकरण पाहून मला मजेदार किस्सा आठवला. भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने राबडीदेवीचं उदाहरण दिलं असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. कारण ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावं वाटतं, असं विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या.

विद्या चव्हाण यांनी केलेल्या उल्लेखानंतर अमृता फडणवीस चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अमृता फडणीस यांनी चव्हाणांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर एक ट्वीट करुन एकेरी उल्लेखात त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Published on: Jan 07, 2022 11:52 PM