Breaking | ST कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर कारवाई मागे घेणार, शेखर चन्ने
साधारण 87 ते 88 हजार कर्मचारी सध्या पटावर आहेत, त्यातील 26 हजार 500 कर्मचारी कामवर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शक्यतो बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार नाही, ती तेवढी सहज प्रक्रिया नाही, ती क्लीष्ट प्रक्रिया असल्याचे सांगण्यात आले आहे. एसटीचे 37 आगार पूर्ण बंद आहेत, तर उर्वरीत आगार कमी क्षमतेने सुरू आहेत.
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St workers Strike) सुरू आहे. वारंवार आवाहन करूनही एसटी कर्मचारी कामावर हजर न राहिल्याने महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संप सुरू झाला होता यावेळी 92 हजार कर्मचारी पटलावर होते, दोन हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाली होती. तसेच कालपर्यंत 3 हजार 100 कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत, अशी माहिती एसटीच्या व्यवस्थापकीय महासंचालकांनी दिली आहे. तसेच संप केल्यामुळे या काळात तब्बल 5 हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. साधारण 87 ते 88 हजार कर्मचारी सध्या पटावर आहेत, त्यातील 26 हजार 500 कर्मचारी कामवर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शक्यतो बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार नाही, ती तेवढी सहज प्रक्रिया नाही, ती क्लीष्ट प्रक्रिया असल्याचे सांगण्यात आले आहे. एसटीचे 37 आगार पूर्ण बंद आहेत, तर उर्वरीत आगार कमी क्षमतेने सुरू आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
