36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 4 November 2021

एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एसटी कर्मचाऱ्यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.

एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्याचा बेमुदत संप सुरु आहे. राज्य सरकारनं महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढवण्याची मागणी मान्य केली असली तर एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एसटी कर्मचाऱ्यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय. त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून सूचक इशारा दिलाय.

“एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल,” अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI