कंत्राटी कामगारांचं षडयंत्र नेमकं कुणाचं? देवेंद्र फडणवीस यांचा थेट आरोप अन् म्हणाले, त्यांना उघडं…
VIDEO | कंत्राटी भरतीवरून राज्यातील विरोधक आणि राज्य सरकार, सत्ताधाऱ्यांमध्ये वार-पलटवार; कंत्राटी कामगारांचं षडयंत्र ठाकरे सरकारच्या काळात झालं आहे, तर महाविकास आघाडीकडून आमच्या सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३ | कंत्राटी कामगारांचं षडयंत्र ठाकरे सरकारच्या काळात झालं आहे, अशी सडकून टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय तर महाविकास आघाडीकडून आमच्या सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काल कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द करण्यात आला याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, याच कंत्राटी भरतीवरून विरोधक आणि राज्य सरकारच्यामध्ये वार पलटवार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडीने माफी मागावी असा इशारा दिल्यानंतर राज्यभरात भाजपचं मविआविरोधात माफी मागो आंदोलन करण्यात आलंय. छत्रपतीसंभाजीनगरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. तर आक्रमक झालेल्या भाजपने कोल्हापुरात जोडे मारो आंदोलन केले.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

