Local Body Election 2025 : नेत्यांना काय वाटतं यापेक्षा… निवडणुका लांबणीवर अन् राजकीय वर्तुळात नाराजी, आयोगानं स्पष्टच म्हटलं…
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं असे आयोगाने म्हटले आहे. निवडणुका पुढे ढकलल्याने काही राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असली, तरी निवडणूक आयोगाचे अधिकारी कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतल्याचे स्पष्ट करत आहेत.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अन्य काही महत्त्वाच्या घडामोडी चर्चेत आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका काही कारणास्तव पुढे ढकलल्याच्या निर्णयानंतर राजकीय नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यावर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं असे आयोगाने म्हटले आहे. काही नगरपरिषदांच्या निवडणुका न्यायिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामुळे राजकीय नेत्यांनी, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश होता, आपली नाराजी व्यक्त केली. मात्र, निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय कायद्याच्या चौकटीतच असल्याचे स्पष्ट केले असून, या भूमिकेवर ते ठाम आहेत. कायदा सर्वांनाच पाळावा लागतो, यावर आयोगाने भर दिला.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

