VIDEO : Uddhav Thackeray | जे हुतात्मे BDD चाळीने दिले, त्यांची एक आठवण ठेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणून हा प्रश्न सुटला, आणि मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते आज शुभारंभ होतोय, याचा आनंद आहे, असंही पवार म्हणाले.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला. या चाळींच्या मध्ये काही बदल केले पाहिजेत, अधिक सुविधा दिल्या पाहिजेत, मालकी हक्क दिला पाहिजे या सगळ्या मागण्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणून हा प्रश्न सुटला, आणि मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते आज शुभारंभ होतोय, याचा आनंद आहे, असंही पवार म्हणाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे हुतात्मे BDD चाळीने दिले, त्यांची एक आठवण ठेवा.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

