VIDEO : Ajit Pawar | शहाण्या तू आमदार आहेस ना, अजितदादांनी भरसभेत दिल्या रोहित पवारांना कानपिचक्या

VIDEO : Ajit Pawar | शहाण्या तू आमदार आहेस ना, अजितदादांनी भरसभेत दिल्या रोहित पवारांना कानपिचक्या

| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 2:24 PM

मी भाषण करताना कधीच मास्क काढत नाही, आणि तिथे मला एकानेही मास्क घातलेले दिसले नाही, असे म्हणत अजित पवार यांनी मास्कवरून रोहित पवार आणि उपस्थित लोकांना कानपिचक्या लगावल्या आहेत. ते बारामती तालुक्यातील धुमाळवाडीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

कर्जत जामखेडला गेलो असता मला तिकडे कोणीच मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. आमच्या रोहितने पण मास्क घातले नव्हते, शेवटी मीच न राहून रोहितला म्हटले शहाण्या तु या मतदारसंघाचा आमदार आहेस, तुच जर मास्क नाही घातलेस तर मी लोकांना मास्क वापरण्यास कसे सांगू? मी भाषण करताना कधीच मास्क काढत नाही, आणि तिथे मला एकानेही मास्क घातलेले दिसले नाही, असे म्हणत अजित पवार यांनी मास्कवरून रोहित पवार आणि उपस्थित लोकांना कानपिचक्या लगावल्या आहेत. ते बारामती तालुक्यातील धुमाळवाडीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.