नागपुरच्या तलावावर स्टंटबाजी तरूणांच्या अंगाशी, ओव्हरफ्लो पॉईंटवर चढले अन्…, काय झालं तुम्हीच बघा?
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्या आल्याने राज्यातील अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच नागपुरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपुरातील मकरधोडका तलावावर काही तरूण स्टंटबाजी केली मात्र तरूणांना स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे.
नागपुरातील मकरधोडका तलावावर काही तरूण स्टंटबाजी करताना पाहिला मिळाले. मात्र ही स्टंटबाजी करणं तरूणांच्या चांगलंच अंगाशी आले आहे. तलावाच्या ओव्हर फ्लो पॉईंटवर स्टंट करणं तीन तरुणांच्या अंगलट आले आहे तर या तलावात बुडून एकाच मृत्यू तर दोन तरुण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलाव ओव्हर फ्लो पॉईंटवर मस्ती करत असलेल्या तीन तरुणांनी स्टंट करत असताना दोन तरुण ओव्हर फ्लो पॉईंटवरून घसरून जखमी झालेत. ही स्टंटबाजी करताना एकाचा बॅलन्स जाऊन तो तलावात पडला, तरुण बुडत असताना वेळीच उपस्थित काही तरुणांनी तलावात उडी घेत तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला पण वेळीच मदत न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. काल स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने सुट्टी असल्याने नागपुरातील मकरधोकडा तलाव परिसरात पर्यटकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले होत. त्यावेळी हा प्रकार घडला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

