Rupali Chakankar : अशी कीड समाजातून वेळीच ठेचून काढली पाहिजे रुपाली चाकणकरांची सदाभाऊ खोतांवर टीका

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केतकीच्या पोस्टवरही अश्लील कमेंट करणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई करण्यात यावी सर्वांसाठी कायदा सामना असावा असे ट्विट त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही रुपाली चाकणकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 'पोलीस व्यवस्थित काम करतायत त्यांना कोणाच्या सल्ल्याची गरज नाही' असे म्हणत चित्रा वाघ यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

प्राजक्ता ढेकळे

|

May 16, 2022 | 5:54 PM

नाशिक – अभिनेत्री केतकी चितळेंसारख्या (Ketaki Chitale)प्रवृत्तीना समर्थन देणाऱ्या काही प्रवृत्ती आजही समाजात आहेत. अशी कीड समाजातून वेळीच ठेचून काढली पाहिजे असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार(Shard Pawar) साहेबांकडे गुरुतुल्य व्यक्तीमत्व म्हणून महाराष्ट्र बघतो. त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणारी ही किड असून ति ठेचून काढली पाहिजे. केतकी चितळेला समर्थन देणारी ही किडच एक सारख्या विचारांची आहे. अशी खोचक टीका रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे. केतकी चितळेंवर कारवाई केल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केतकीच्या पोस्टवरही अश्लील कमेंट करणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई करण्यात यावी सर्वांसाठी कायदा सामना असावा असे ट्विट त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही रुपाली चाकणकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘पोलीस व्यवस्थित काम करतायत त्यांना कोणाच्या सल्ल्याची गरज नाही’ असे म्हणत चित्रा वाघ यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें