केंद्राने ‘ती’ मान्य चूक केली; अफवा पसरवण्याचं काम करु नये : मुनगंटीवार
विरोधकांना राईचा पर्वतच नाही तर राईच्या फोटोचा पर्वत करण्याच्या सवयी या 21व्या शतकात लागलेल्या आहेत
मुंबई : खतं घेण्यासाठी केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी ई पास मशिन तयार करण्यात आलं आहे. त्यात माहिती भरताना जात टाकावी लागते. यावरून काँग्रेसचे विधान परिषद गटनेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकावर सडकून टीका. तसेच सभागृहात हा विषय मांडला. त्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहातच विरोधकांवर टीका करत तुमच्या सारख्यांना कारण नसताना संधी मिळू नये आणि चूक झाली असेल तर चूक दुरुस्त ताबडतोब केली पाहिजे म्हणून माझा विषय नसताना मी बाजू मांडत आहे. विरोधकांना राईचा पर्वतच नाही तर राईच्या फोटोचा पर्वत करण्याच्या सवयी या 21व्या शतकात लागलेल्या आहेत. कोणत्याही सरकारने जात निहान खत वाटप असा कोणतीही निर्णय घेतलेला नाही. या चुकीच्या संदर्भात राज्य सरकारकडून मनोज आहुजा कृषी सचिव भारत सरकार यांना कळविण्यात आली आणि ही चूक निश्चितपणे केंद्र सरकारकडून दुरुस्त केल्या जाणार आहे महाराष्ट्राच्या जनतेने याची नोंद घ्यावी
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..

