कोविड घोटाळा प्रकरणी राऊत यांना धक्का; निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक
याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप करताना ईडीकडे पुरावे सादर करत तक्रार केली होती. त्यावेळी त्यांनी राऊतांच्या मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असा आरोप केला होता.
मुंबई, 20 जुलै 2023 | ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अखेर अटक झाली आहे. मुंबईतील कोविड सेंटरमधील घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ही कारवाई करत पाटकर यांना अटक केली आहे. तर पाटकर यांच्यासह ईडीने एका डॉक्टरला देखील अटक केली आहे. ईडीकडून ही कारवाई आज पहाटे करण्यात आली. तर याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप करताना ईडीकडे पुरावे सादर करत तक्रार केली होती. त्यावेळी त्यांनी राऊतांच्या मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असा आरोप केला होता. जम्बो कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी पाटकर यांच्यासह डॉ. किशोर बिचुले यांना ईडीने अटक केली आहे. तर पाटकर यांच्या अटकेमुळे राऊत यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

