Jay Pawar On Sunetra Pawar | बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?

| Updated on: Apr 16, 2026 | 3:39 PM

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी भावनिक साद घालत ही मागणी पुढे आणली होती. आता पवार कुटुंबातील सदस्यांकडूनही या मागणीला दुजोरा मिळत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी माध्यमांशी बोलताना, “दादांच्या जाण्यामुळे लोकांमध्ये अजूनही दुःख आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा होती, मात्र आता आम्ही प्रचारात व्यस्त आहोत,” असं सांगितलं. तसेच, रोहित पवार, पार्थ पवार आणि इतर कुटुंबीय प्रचारात सहभागी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. याशिवाय, सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत, त्या मुख्यमंत्री झाल्यास सर्वांसाठी आनंदाची बाब ठरेल, असंही जय पवार यांनी म्हटलं. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Published on: Apr 16, 2026 03:39 PM
Follow Us