“मनीषा कायंदे यांना भविष्यात पश्चाताप होईल”, ठाकरे गटाच्या आमदाराची टीका
आमदार मनीषा कायदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटावर तुटून पडणाऱ्या शिवसेनेच्या आक्रमक फायरब्रँड नेत्यांपैकी एक मनीषा कायदे यांनीही आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. यावर ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : आमदार मनीषा कायदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटावर तुटून पडणाऱ्या शिवसेनेच्या आक्रमक फायरब्रँड नेत्यांपैकी एक मनीषा कायदे यांनीही आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. यावर ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनीषा कायंदे आमच्यासोबत आमच्या सहकारी म्हणून विधान परिषदेत काम करत होत्या. अतिशय तळमळीने त्यांनी त्या भूमिका मांडत होत्या. अतिशय निष्ठेने त्या बोलत होत्या, परंतु अचानक काय झाले माहित नाही. आम्हाला सोडून त्या दुसरा गटात गेल्या आहेत, त्याचा आम्हाला वाईट वाटतंय,” असं सुनील शिंदे म्हणाले. “ते आधी दुसरा पक्षात होते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी संधी मिळत नव्हती परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर त्यांना विधान परिषद जाण्याची संधी मिळाली, त्यांनी या गोष्टीची जाण ठेवली नाही. मनीषा कांदे यांना त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा नक्कीच भविष्यात पश्चाताप होणार आहे,” असंही सुनील शिंदे म्हणाले.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र

