SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून गरिबांना मिळणार धान्य आता बंद होणार आहे. केंद्र सरकारने यासाठी दिलेली तीन दिवसांची मुदत वाढ ही संपणार आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Sep 28, 2022 | 9:32 AM

औरंगाबाद खंड पीठाने सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा स्थगन आदेश मान्य केला आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग हा मोकळा झाला आहे. याबाबत राज्यशासनाकडून खंड पीठाकडे स्थगन आदेश मागे घेत असल्याचे पत्र देण्यात आलं होतं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यानंतर आता विदर्भातील नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तर पुण्यातील मेट्रोचे विस्तारीकरण होणार आहे. नवरात्रीनिमित्त कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरात येणाऱ्या पर्यटकांचा सन्मान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून गरिबांना मिळणार धान्य आता बंद होणार आहे. केंद्र सरकारने यासाठी दिलेली तीन दिवसांची मुदत वाढ ही संपणार आहे. तर तब्बल सहा वर्षानंतर नोटबंदीबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालात होणार आहे. ही सुनावणी आज होणार आहे.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें