SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 16 August 2021
सांगली विधानसभेच्या उमेदवारीबाबत काँग्रेसमधील सुप्त संघर्ष आज एका उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसनंही यात उडी घेत यंदा आपली दावेदार असणार असं मिश्कील पणे जाहीर केलं आहे.
सांगली विधानसभेच्या उमेदवारीबाबत काँग्रेसमधील सुप्त संघर्ष आज एका उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसनंही यात उडी घेत यंदा आपली दावेदार असणार असं मिश्कील पणे जाहीर केलं आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बजाज यांच्यात ही उमेदवारीची मिश्कील चर्चा रंगली होती. मात्र ही मिश्कील टोलेबाजी भविष्यातील संघर्षाची ठिणगी असल्याची चर्चा सांगलीत ऐकायला मिळत आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नारळ फोडण्यासाठी विशाल पाटील यांना आग्रह केला. मात्र, विशाल पाटलांनी पृथ्वीराज पाटील पहिल्यांदा नारळ फोडतील असं स्पष्ट केल्याने जयंत पाटलांनी पृथ्वीराज पाटील यांना नारळ फोडण्यासाठी सांगितलं. यावेळी पृथ्वीराज पाटील नारळ फोडण्यासाठी पुढे येताच विशाल पाटलांनी सगळे नारळ फोडण्याचे काम पृथ्वीराज बाबांनी करावे आणि ऐनवेळी उमेदवारी व तिकीट आपल्याला मिळो असं मिश्कील वक्तव्य केलं. हे टिप्पणी ऐकून एकच हास्यकल्लोळ सुरू झाला. मात्र पृथ्वीराज पाटील यांनी यावर हजरजबाबीने उत्तर देत ती मिळो पण लोकसभेची मिळो,अशा शब्दात शुभेच्छा दिल्याने पुन्हा एकदा चांगलाच हशा पिकला. काँग्रेस नेत्यांची ही मिश्कील जुगलबंदी संपते तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा सांगलीच्या जागेवर दावा असणार असं सांगितल्यानं हा हशा बराच काळ टिकला.
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप

