SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 19 June 2021

Nagpur Coronavirus | गेल्या 24 तासांत नागपुरात एकही कोरोनाबळी गेला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. तब्बल 130 दिवसानंतर नागपुरात दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्यानं नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपुरातील कोरोनास्थिती अत्यंत चिंताजनक आणि राज्य सरकारची डोकेदुखी वाढवणारी ठरली. नागपूर जिल्ह्यातील मृत्यूदरही राज्यात सर्वाधिक ठरला होता. मात्र आता नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत नागपुरात एकही कोरोनाबळी गेला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. तब्बल 130 दिवसानंतर नागपुरात दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्यानं नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपुरात गेल्या 24 तासांत 55 नव्या रुग्णांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात 7 फेब्रुवारी 2021 रोजी एकही मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली आणि नागपुरात कोरोनाने थैमान घातलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपुरात रोज शेकडो मृत्यूची नोंद होत होती. मात्र आता तब्बल 130 दिवसानंतर नागपुरातील कोरोना मृत्यूची साखळी तोडण्यात नागपूरकरांना यश आलंय. आज दिवसभरात नागपुरात 55 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 100 वर आली आहे. तर जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.88 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI