SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 3 September 2021
मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे शिवाय जमीनी खरवडून निघाल्या आहेत तर काही भागात घाट कोसळून वाहतूक ठप्पही झाली होती. याबाबत कालच कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या – त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी या सगळ्या नुकसानीची पाहणी करत आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.
मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय त्या – त्या जिल्हयाचे पालकमंत्री घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे शिवाय जमीनी खरवडून निघाल्या आहेत तर काही भागात घाट कोसळून वाहतूक ठप्पही झाली होती. याबाबत कालच कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या – त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी या सगळ्या नुकसानीची पाहणी करत आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.
औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील महसूल मंडळांपैकी 7 मंडळांत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिले आहेत. कन्नड तालुक्यातील भिलदरी तलाव फुटल्याने भोवतालच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांची व्यथा जाणून घेतली. तसेच गावनिहाय पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी नागद, सायगव्हाण या भागातील पिकांचीही यावेळी पाहणी केली.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ